महिलांनी एकमेकांच्यात भांडण केलं, पोलिसांत गेल्या, तिथे जाऊन पोलिसांना मारहाण केली!
तीन तरुणींनी चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.पुण्याच्या कासेवाडी परिसरात हा प्रकार घडलाय. इथल्या दोन स्थानिक महिलांमध्ये वाद सुरु होता. त्यातली एक महिला पोलिसांकडे गेली, दुसरी सुद्धा तिच्या मागे गेली आणि तिने आधी पोहोचलेल्या त्या महिलेला शिवीगाळ करायला सुरुवात केली.
पुणे : तीन तरुणींनी चक्क महिला पोलीस (Lady Police) कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्याच्या कासेवाडी परिसरात हा प्रकार घडलाय. इथल्या दोन स्थानिक महिलांमध्ये वाद सुरु होता. त्यातली एक महिला पोलिसांकडे गेली, दुसरी सुद्धा तिच्या मागे गेली आणि तिने आधी पोहोचलेल्या त्या महिलेला शिवीगाळ (Abuse) करायला सुरुवात केली.या नंतर पोहचलेल्या महिलेने तिथे उपस्थित असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणातील दोषी महिलानांवर खडक पोलीस स्टेशन (Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Published on: Jun 04, 2022 07:07 PM