मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला २ मंत्रिपद मिळणार? कुणाची नावं चर्चेत?

| Updated on: May 24, 2023 | 11:10 AM

VIDEO | मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला दोन मंत्री पदं, कोणाची लागणार वर्णी...बघा व्हिडीओ

पुणे : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. यासंदर्भात शिंदे गटातील आमदारांकडून दावाही केला जात आहे. तसेच राज्याच्या विस्तारासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये शिंदे गटातील दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये माधुरी मिसाळ, राहुल कुल आणि महेश लांडगे ही तीन नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आली आहे. राहुल कुल यांनी याआधीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहर असा समतोल साधण्याची शक्यता मंत्रिमंडळ विस्तारात केली जाणार आहे.

Published on: May 24, 2023 11:10 AM
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक? काय आहे कारण? भाजप-शिंदे गटातील बाशिंग बांघलेल्या आमदाराचं काय?
‘…नव्या संसद भवनाचं उद्घाटन कशासाठी?’, संजय राऊत यांचा नेमका सवाल काय?