Pune Ganeshotsav : ओम नमस्ते गणपतये… तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन

| Updated on: Sep 08, 2024 | 12:09 PM

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे यंदा ३९ वे वर्ष होते.

Follow us on

मुंबई, पुण्यासह राज्यभरात लाडक्या बाप्पा गणरायाचं दणक्यात स्वागत झालंय. गणेशोत्सव म्हटलं की मुंबई आणि पुण्यातील बाप्पाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे आणि आरास अन् उंचच उंच बाप्पाच्या मुर्त्या याची नेहमीच चर्चा असते. अशातच पुण्यात दरवर्षी गणेशोत्सवात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या सहभागाने सामुहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात येते. यंदाही गणपती बाप्पाच्या जयघोषाने तब्बल ३१ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून बाप्पाला नमन केल्याचे पाहायला मिळाले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात महाराष्ट्रीयन संस्कृती जपत पारंपरिक वेशात मध्यरात्री १ वाजल्यापासून महिलांनी या अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणरायाचा जयघोष करीत अथर्वशीर्ष पठणासोबत महाआरती करत पुण्यात महिलांनी स्त्री शक्तीचा एकच जागर केला. पुण्यातील शिवाजी रस्त्यावर हे मनमोहक दृश्य पाहायला मिळालं. बघा अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाची ड्रोन दृश्य