पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या, बघा व्हिडीओ

| Updated on: Sep 17, 2024 | 3:32 PM

पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पांच्या मिरवणुका सकाळपासून सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. गणपती बाप्पा मोरया....पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पाल भावपूर्ण निरोप देण्यात येतोय

Follow us on

मुंबईप्रमाणे पुण्यातही मोठ्या उत्साहात जल्लोषात गणपती बाप्पांच्या मिरवणुका सुरू आहेत. गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. पुण्यातील मंडई चौकात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी आणि यंदाच्या वर्षातील शेवटचं दर्शन मिळावं यासाठी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील पाचही मानाचे गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाले आहेत. पुण्यातील मंडई चौकात गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांचं वादन सुरू आहे. दरम्यान, पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती अलका चौकात दाखल होत असताना त्याला भावपूर्ण निरोप देत असताना पुण्यातील चौका-चौकात मोठाल्या रांगोळ्या काढून स्वागत केले जात आहे. राष्ट्रीय कला अकादमीच्या माध्यमातून पुण्यातील अलका चौकात भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. मनमोहक असं रूप हे ड्रोनच्या माध्यमातून कैद करण्यात आलं आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रीय कला अकादमीचे कलाकार विसर्जन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या घालतात आणि बाप्पासह गणेश भक्तांचे स्वागत करतात.