Pune Ganpati Visarjan Miravnuk : पुण्यात 27 तास उलटले तरीही मिरवणूक सुरूच, गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?

| Updated on: Sep 18, 2024 | 3:00 PM

पुण्यातील शेवटचे महाराष्ट्र तरुण मंडळ विसर्जन होणारे गणेश मंडळ आहेत. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमधील हा शेवटचा गणपती विसर्जन होणार आहे. दरम्यान, काल साडे दहा वाजता पुण्यातील मिरवणूक सुरू झाली होती त्याला जवळपास 28 तास पूर्ण होत आलेत.

मुंबई पुण्यात नेहमीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची चर्चा अजूनही सुरूच आहे. अवघ्या काहीच वेळापूर्वी मुंबईत गिरगाव चौपाटीवर मुंबईतील प्रसिद्ध आणि नावाजलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन कऱण्यात आलं. तब्बल २५ तासानंतर जड अंतःकरणाने लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. मात्र पुण्यात अद्याप गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहेत. पुण्यातील मिरवणूक सुरु होऊन २७ तास उलटून गेले तरी बाप्पाचं विसर्जन बाकी असल्याचे आहे. गेल्यावर्षी  पुण्यात तब्बल २८ तास गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका या सुरूच होत्या. त्यामुळे यंदा हा रेकॉर्ड ब्रेक होणार का? अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरूआहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १ वाजेपर्यंत १७२ गणेशोत्सव मंडळं अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाली आहेत. तर पुण्यातील कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यांवरील अनेक गणपती अजूनही अलका टॉकीज चौकात पोहोचत आहेत. मागच्या वर्षी साडे चार वाजेच्या दरम्यान, शेवटचा गणपती अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाला होता. मात्र यंदा हा रेकॉर्ड मोडणार की आधीच मिरवणुका संपणार असा प्रश्न निर्माण होतोय.

Published on: Sep 18, 2024 02:57 PM