दत्तात्रय भरणे यांची बातच न्यारी, डिकसळ ग्रामस्थांच्या आग्रहाखातर घोडेस्वारी
डिकसळ या गावी 4 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने मंत्री दत्तात्रय भरणे त्याठिकाणी गेले असता ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत मिरवणूक काढली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आपल्यास सहज,साधेपणाने वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर आपल्या कामाच्या बाबतीतही जाते अधिक सजग असलेल्या पहिली मिळतात. यामुळेच ते ग्रामीण भागात ते प्रसिद्ध आहेत. अनेकदा छोट्यात छोट्या कार्यकर्त्यालाही दत्तात्रय मामा आपले वाटतात. असाच प्रसंग इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे घडला आहे. इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे गावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे खूष झालेल्या गावकऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली आहे.