तरुणानं प्रसंगावधान राखत वृद्ध दाम्पत्याला वाचवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Mar 23, 2022 | 11:16 AM

ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटलेली बाईक पादचारी युवकाने प्रसंगावधान राखून थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुणे जिल्ह्यात इंदापूर जंक्शन येथे हा प्रकार घडला.

इंदापूर, पुणे : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय पुण्यातील एका वृद्ध दाम्पत्याला आला. ब्रेक फेल (Brake Fail) झाल्यामुळे या दाम्पत्याची बाईक अपघातग्रस्त (Bike Accident) होण्याची भीती होती. मात्र पादचारी युवकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. इंदापूर जंक्शन (Indapur Junction) येथे हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इंदापूरमधील वृद्ध दाम्पत्याच्या दुचाकीचे ब्रेक निकामी झाले होते. यावेळी एका युवकाने पळत जाऊन त्यांची बाईक धरली. त्यामुळे वृद्ध पती-पत्नी सुखरूप बचावले. युवकाच्या प्रसंगावधानावने अनर्थ टळल्यामुळे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

खासदार दाखवा बक्षिस मिळवा; शिवसेना खासदार भावना गवळींविरोधात पोस्टरबाजी
मायंगडेवाडीमध्ये बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण