‘गौतमी पाटील गरीब परिस्थितीतून वर आली, तिचं करियर…’, बड्या नेत्यानं कौतुक करत दिला पाठिंबा
VIDEO | बड्या नेत्यानं गौतमी पाटील हिच्या समर्थनार्थ मांडली भूमिका, नेमकं काय म्हटलं? बघा व्हिडीओ
पुणे : डान्सर गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून तिच्या अडनावाच्या मुद्द्यावरून चांगलीच चर्चेत आहे. गौतमी पाटील सातत्याने कोणत्या न कोणत्या प्रकरणावरून चर्चेत असते. गौतमी पाटील हिच्या अडनाव बदलण्याच्या प्रकरणावरून तिला अनेक राजकीय नेते मंडळींनी पाठिंबा दर्शविला तर काहीनी विरोध केला. अशातच एका बड्या नेत्यानं गौतमी पाटील हिच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली आहे. अशातच आता खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीला पाठिंबा दिला आहे. गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आलीय. तिला संपवू नका, अस आवाहन दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गर्दी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात होते, ऐवढा चाहाता वर्ग गौतमीचा झाला आहे. राज्यात आजकाल अनेकजण पाटील आडनाव लावत असल्याचे दाखले देत मोहिते पाटलांनी राज्यकर्त्यांना साद घालत गौतमीला संपवू नका, असे आवाहन केलंय. दिलीप मोहिते पाटील त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते असेही म्हणाले, “गौतमी पाटील हिने पाटील नाव केलं तर तुमचं काय बिघडलं? तुम्ही तिला का ट्रोल करताय हे मला कळत नाहीय. ती नवीन कलाकार आहे. तिचं आयुष्य इतक्या लवकर संपवू नका, एवढीच माझी विनंती राहणार आहे. एखाद्या कलाकाराचं जीवन संपवू नका. ती अतिशय गरीब परस्थितीतून तिच्या कलेच्या माध्यामातून लोकांना कळली”.