Pune | पुण्यातील लोहगाव विमानतळ 15 दिवस बंद राहणार

| Updated on: Oct 05, 2021 | 8:18 PM

लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे 15 दिवस बंद राहणार आहेत. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता मुंबई विमानतळावर अवलंबून राहावं लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सप्टेंबर 2020 पासून हाती घेण्यात आलं आहे. 26 ऑक्टोबरपासून या कामाचा महत्वाचा टप्पा सुरु झाला होता. तेव्हापासून लोहगाव विमानतळावरुन रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मागील वर्षभर या विमानतळावरुन फक्त दिवसाच उड्डाणं होत होती. मात्र आता 16 ऑक्टोबरपासून 16 दिवस तिही बंद होणार आहे. 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळावरुन प्रवासी उड्डाणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहेत.

Mumbai | राज्याचे गृहमंत्री सुडाचे राजकारण करण्यात मग्न, Atul Bhatkhalkar यांचा आरोप
Bacchu Kadu | पुढच्या काळात गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घेऊ : बच्चू कडू