तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केला हल्लाबोल?
महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल', असं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केल्याचे पाहायला मिळाले
मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उद्या पुण्यात सभा होणार आहे. मोदी हे पुण्यात येऊन गेल्यानंतर राहुल गांधींची पुण्यात सभा होणार आहे. दरम्यान, प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी येत असून मोदींच्या सभेला उत्तर म्हणून ही सभा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल’, असं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना रवींद्र धंगेकर यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही वक्तव्य केले आहे. आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आपण पाहिलेत, पण कोरोना काळात केलेलं श्रेय हे उद्धव ठाकरे यांना द्यावं लागेल , असे म्हणत त्यांनी ठाकरेंचे कौतुक केले आहे.