पुणे लोकसभा कोण लढणार? पुण्याच्या जागेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीत रस्सीखेच
VIDEO | गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची रिक्त जागा लढवण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीने कसली कबंर
मुंबई : पुणे लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याच्या जागेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादी दोघेही आग्रही आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी भाजपचे नेते गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे ही जागा लढवण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीने कबंर कसली आहे. मविआमध्ये ज्यांची ताकद जास्त त्यांनीच पुण्यातील जागा लढवावी असे अजित पवार यांनी म्हटलंय. तर काँग्रेसच्या मोहन जोशी यांनी ही जागा काँग्रेसचीच असल्याचा दावा केलाय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट यांच्या विरोधात काँग्रेसचे मोहन जोशी लढले होते. भाजपचे नेते गिरीश बापट यांना ६ लाख ३२ हजार ८३५ मंत तर काँग्रेसच्या मोहन जोशी यांना ३ लाख ८ हजार २०७ मतं मिळाली होती. तब्बल २ लाख ५३ हजार मतांनी बापट विजयी झाले होते. पण आता कुणाची ताकद दिसणार… बघा स्पेशल रिपोर्ट…