Special Report | पुण्यातील मसाला किंग धनंजय दातार यांचा रिक्षा रुग्णवाहिका उपक्रमाला मदतीचा हात
विदर्भातून थेट दुबईत झेप घेऊन डॉ. धनंजय दातार यांनी जगभरात नाव कमावलं आहे. ‘मसाला किंग’ म्हणून ते ख्यातकीर्त आहेत. अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले धनंजय दातार अनेकदा गरजूंना मदत करत असतात. डॉ. दातार यांनी सौदी अरेबियातील तुरुंगवासात अडकलेल्या 700 भारतीय कामगारांची सुखरुप सुटका केली होती. आता मसाला किंग धनंजय दातार यांनी पुण्यातील रिक्षा रुग्णवाहिका उपक्रमाला मदतीचा हात दिला आहे.
कष्टांना प्रामाणिकपणाची जोड देत विदर्भातून थेट दुबईत झेप घेऊन डॉ. धनंजय दातार यांनी जगभरात नाव कमावलं आहे. ‘मसाला किंग’ म्हणून ते ख्यातकीर्त आहेत. अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले धनंजय दातार अनेकदा गरजूंना मदत करत असतात. डॉ. दातार यांनी सौदी अरेबियातील तुरुंगवासात अडकलेल्या 700 भारतीय कामगारांची सुखरुप सुटका केली होती. आता मसाला किंग धनंजय दातार यांनी पुण्यातील रिक्षा रुग्णवाहिका उपक्रमाला मदतीचा हात दिला आहे.
दहावीत पाचवेळा नापास झालेले दातार गडगंज संपत्तीचे मालक आहेत. आखाती देशात त्यांनी 39 सुपरमार्केट्स उघडली असून अमेरिका, कॅनडा, इटली, स्वित्झर्लंड, टांझानिया अशा देशांमध्ये कंपनीचा विस्तार आहे.