Pune | मेडिकलच्या दुकानात चोरट्यांचा PPE कीट घालून चोरी करण्याचा प्रयत्न फसला

| Updated on: Dec 09, 2021 | 12:44 PM

मावळ तालुक्यातील पवनानगर येथे एका मेडिकलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन चोरांनी,पीपीई किट घालून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसल्याने चोर तिथून पसार झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या चोरी ,दरोड्याच्या घटना पोलिसांना डोकेदुखी ठरते आहे. जुन्नर येथे बँकेवर दरोडा,त्यानंतर मावळमध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये सशास्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मावळ तालुक्यातील पवनानगर येथे एका मेडिकलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन चोरांनी,पीपीई किट घालून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसल्याने चोर तिथून पसार झाले आहेत. संबधित सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कॅमेऱ्यात चित्रित झालाय.

Ashish Shelar | सत्तेचा दुरूपयोग करून खोटा माझ्यावर गुन्हा, आशिष शेलारांचा पलटवार
Sanjay Raut | वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी असते तरी मी खुर्ची दिली असती, टीकेनंतर राऊतांचं स्पष्टीकरण