Murlidhar Mohol | पुण्यात कुठलीही पाणी कपात नाही, अमित शहांचा दौरा नियोजित वेळेप्रमाणे

| Updated on: Nov 18, 2021 | 8:26 PM

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी बोलताना अमित शाह यांचा दौरा नियोजित वेळेप्रमाणे होणार आहे. वसंतदादा इन्स्टिट्यूट भेटीबाबत मला माहिती नाही, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलंय. तसंच पुण्यातील नव्या मेडिकल कॉलेजसाठी महापौर नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे पुणे शहरात कुठलीही पाणी कपात केली जाणार नाही, असंही मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.

पुणे महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. अशावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी बोलताना अमित शाह यांचा दौरा नियोजित वेळेप्रमाणे होणार आहे. वसंतदादा इन्स्टिट्यूट भेटीबाबत मला माहिती नाही, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलंय. तसंच पुण्यातील नव्या मेडिकल कॉलेजसाठी महापौर नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे पुणे शहरात कुठलीही पाणी कपात केली जाणार नाही, असंही मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. यावेळी महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन होईल. तसेच पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे.

Abu Azmi | राज्यातील सरकार पाडण्यासाठी ‘हा’ कट रचल्याचा माझा संशय – अबू आझमी
Anil Parab | गोपीचंद पडळकर यांनी गरज असेल तर सुरक्षा देणार : अनिल परब