MHADA Lottery | पुण्यात घरं घेण्याचं स्वप्न होणार साकार, कधी निघणार 5 हजार 863 घरांची सोडत?

| Updated on: Sep 06, 2023 | 8:12 AM

VIDEO | पुणे शहरात घर घेण्याचं स्वप्न होणार साकार...पुण्यातील म्हाडाच्या 5 हजार 863 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध, 29 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे तर 18 ऑक्टोबर रोजी सोडत निघणार आहे

पुणे, ६ सप्टेंबर २०२३ | पुण्यातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पुणे मंडळातील एकूण 5 हजार 863 घरांसाठी ही प्रक्रिया सुरु केली आहे. या घरांकरता नागरिकांना 5 सप्टेंबरपासून ते 29 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यानंतर 18 ऑक्टोबर रोजी या घरांसाठी सोडत निघणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा चार गटात पुण्यातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये पुणे मंडळाने सुमारे 6 हजार घरांची सोडत काढली होती. यानंतर आता ही सोडत निघणार आहे. मुंबईमधील म्हाडाच्या घरांची नुकतीच लॉटरी काढण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहरात देखील लवकरच म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

Published on: Sep 06, 2023 08:12 AM
पुण्यातील PMPML चे ‘हे’ ८ मार्ग उद्या राहणार बंद, प्रशासनानं का घेतला निर्णय?
‘चोरांचे सरदार दिल्लीचे सरकार चालवत आहेत’, सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार निशाणा