वसंत मोरे यांच्या नाराजीचं कारण आलं समोर, ‘त्या’ घटनेपासून झाली खरी सुरूवात

| Updated on: Mar 13, 2024 | 3:39 PM

'पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे', असं वसंत मोरे यांनी म्हटलं होतं. मात्र अशातच आता वसंत मोरे यांच्या नाराजीचं खरं कारण समोर आलं आहे

पुणे, १३ मार्च २०२४ : गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे मनसेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना काल वसंत मोरे यांनी फेसबूकवर सकाळी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आणि दुपारी थेट राजीनामा दिल्याची फेसबूक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तरपणे राजीनाम्याचं कारण स्पष्ट केले. वसंत मोरे म्हणाले, मी राज ठाकरे किंवा मनसे या पक्षामुळे राजीनामा देत नाही तर पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे. अशातच आता वसंत मोरे यांच्या नाराजीचं खरं कारण समोर आलं आहे. ‘सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा…’, असे अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना झापलं होतं. अमित ठाकरे यांनी झापल्यापासूनच वसंत मोरे नाराज असल्याची माहिती आहे. अमित ठाकरे यांच्या पुण्यातील एका मोर्च्यानंतर मोरेंनी फेसबूक पोस्ट केली होती. त्यावरून अमित ठाकरेंनी मोरेंची कानउघाडणी केली होती. तेव्हापासूनच या नाराजीला सुरूवात झाल्याची माहिती मिळतेय.

Published on: Mar 13, 2024 03:39 PM
Loksabha Election : मुंबईत भाजपचं धक्कातंत्र, ‘या’ तीन विद्यमान खासदारांना मिळणार डच्चू?
विजय शिवतारेंची राष्ट्रवादीच्या नेत्यानं इशारा देत काढली लायकी अन् औकात, बघा काय केला हल्लाबोल?