Pune | पुण्यात कोरोना नियम न पाळणाऱ्या 4 मोठ्या हॉटेल्सवर कारवाई, पोलिसांच्या कारवाईनं खळबळ
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार मोठ्या हॉटेलवर मुंढवा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांची कारवाईने खळबळ उडाल्याचा दिसून आलं.
पुणे : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार मोठ्या हॉटेलवर मुंढवा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांची कारवाईने खळबळ उडाल्याचा दिसून आलं. मुंढवा परिसरात सुरू असलेल्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्ट्यांमध्ये जाऊन पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी हॉटेलमध्ये स्वतः जाऊन साऊंड सिस्टिम बंद केली. कोरोना नियमांचं उल्लंघन सर्रास होत असल्याचं दिसून आलं आहे. हॉटेल मालकाला वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या. हॉटेल मालकांची बैठक घेऊनही कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात येत होतं.