पुणे महापालिकेचा पुणेकरांना मोठा दिलासा, कराबाबत कोणता घेतला निर्णय? बघा व्हिडीओ
VIDEO | पुणेकरांना मोठा दिलासा, पुणे महापालिकेने कराबाबत कोणता घेतला निर्णय?
पुणे : पुणे महापालिकेकडून पुणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. यंदा मिळकत करात कोणतीही वाढ न करण्याचा पुणे महापालिकेने निर्णय घेतला आहे. आधी होता तोच मिळकत कर लागू असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मिळकत करात ११ टक्के वाढ होणार, अशा चर्चा सुरू होत्या, मात्र या चर्चांवर पुणे महापालिकेने पूर्णविराम दिला आहे. यावेळी पुणे महापालिकेकडून असे सांगण्यात आले की, पुणे महापालिकेत नगरसेवक नियुक्त समिती नसल्याने यंदा मिळकत करात कोणतीही वाढ होणार नसल्याचे सांगितले गेले. २०१५ आणि २०१६ साली असणारी कर रचना तशीच असणार असल्याचे पुणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.