अजित पवार कॅमेरे बघताच तडका-फडकी गाडीत बसून निघून गेले अन्…
VIDEO | अजित पवार यांच्यासमोर जेव्हा कॅमेरा आला, त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले आणि माध्यमांशी बोलणं टाळलं, पण का?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे परखड मत व्यक्त करणारे नेते अजित पवार आज पुण्यात माध्यमांचे कॅमेरे बघताच तडका-फडकी निघून गेले. एका बैठकीनिमित्त अजित पवार पुण्यात होते. बैठक संपल्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतील, अशी आशा होती. पण अजित पवार आले, त्यांनी कॅमेरे पाहिले अन् इतक्यात वेगाने पावलं टाकत तिथून निघून गेले, त्यांनी कुणाशीही बोलायला नकार दिला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. राजकीय वर्तुळात सध्या अनेक वक्तव्य केली जात आहेत. यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे अजित पवारांच्या दिशेने रोखलेले होते. मात्र बैठक संपल्यानंतर ते लिफ्टमधून खाली आले. तेव्हा माध्यमांचे कॅमेरे पाहून त्यांनी चालण्याचा स्पीड एकदम वाढवला. कुणाकडेही न पाहता ते तडक निघाले.