Special Report | कार्यकर्ते चुकले, नेते मात्र बरोबर?
अजित पवार यांच्या कार्यक्रमात झालेली गर्दी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 दिडशे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता ही गर्दी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 दिडशे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवणारी ठरु शकते. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्यानंतर आज जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune NCP party office Inauguration | Case file against 100 to 150 NCP Party workers)