Pune | पुण्यात भाजपच्या बॅनर्सविरोधात राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन

| Updated on: Dec 19, 2021 | 12:34 PM

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी दोषी असलेल्या लोकांवर कारवा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमित शाह यांच्या हस्ते पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी होणार आहे. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे.

Pankaja Munde | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पेशन्स शिकण्यासारखे, पंकजा मुंडेंकडून कौतुक
Mumbai | छ. शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरणी मुंबईतील लालबागमध्ये शिवसेनेचं निषेध आंदोलन