गणित म्हटलं तर मनात धास्ती पण अनोख्या पद्धतीने फॅाम्युले शिकवणाऱ्या ‘या’ शिक्षकाची होतेय चर्चा
VIDEO | गणिताचे फॅाम्युले अनोख्या पद्धतीने शिकवणारा शिक्षक, काय आहे त्यांची खासियत ज्यानं गणिताची भिती विद्यार्थ्यांच्या मनातून नाहीशी, बघा व्हिडीओ
पुणे : गणित म्हटलं की अनेक विद्यार्थी घाबरून जातात पण पिंपरी चिंचवड मधल्या अभिजित भांडारकर या शिक्षकाने गणिताचे 1हजार 80 फॅाम्युले संगीतमय पद्धतीने तयार केले आहेत. त्यांच्या या उपक्रमाची विक्रम म्हणून अनेक ठिकाणी नोंद करण्यात आली असून अनोख्या पद्धतीने गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकाची होतेय सर्वत्र चर्चा.. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या या उपक्रमाची नोंद झाली आहे तर नुकतेच त्यांची नोंद जागतिक वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणितात शून्य मार्क मिळत होते त्यांनी वर्षभरात 82 मार्क मिळवण्याची किमया साधलीय. काय आहे या गणित विषय शिकवणाऱ्या पिंपरी चिंचवड मधल्या अभिजित भांडारकर या शिक्षकाची खासियत आणि किचकट गणिताचा विषय लिलया पद्धतीने शिकवणाऱ्या शिक्षकाची युक्ती… बघा व्हिडीओ
Published on: Apr 24, 2023 09:07 AM