पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, ५० ते ६० प्रवाशांची बस उलटली अन्…
VIDEO | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, बघा कसा आणि कुठे झाला नेमका अपघात?
पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पुणे सोलापूर महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. ५० ते ६० प्रवाशांना घेऊन जाणारी एक खासगी बस पुणे सोलापूर महामार्गावर उलटली आहे. ही खासगी बस मुंबईहून तेलंगणाकडे जात असताना भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातामध्ये १२ ते १३ प्रवासी गंभीर जखमी आहेत. हा अपघात झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळी उपस्थितांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. हा अपघात झाल्यानंतर पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. या खासगी बसमध्ये ६० प्रवाशी होती मात्र त्यातील १३ प्रवाशी गंभीर असल्याची माहिती मिळतेय. या घटनेचा तपास सध्या सुरू असून जखमींमध्ये कोणाचा समावेश आहे, याचा तपास सुरू आहे.
Published on: Apr 25, 2023 08:20 AM