मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाला उशीर होणार? पाहा व्हीडिओ…

| Updated on: Apr 29, 2023 | 10:36 AM

Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : मावळमधील मतमोजणीचा वेग पाहता, अंतिम निकाल यायला उशीर होण्याची शक्यता आहे. पाहा व्हीडिओ...

मावळ, पुणे : मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी थांबवून कर्मचाऱ्यांचा नाष्ट्यावर ताव मारला. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी अर्धा तासांतच थांबली आहे. मतमोजणी थांबवून कर्मचारी नाष्ट्यावर ताव मारत आहेत. स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांच्या सूचनेनंतर कर्मचाऱ्यांनी मतमोजणी थांबवली आणि केंद्रातच सगळ्यांनी नाष्ट्याला सुरुवात केलीये. त्यामुळे नाष्टा संपल्यावर पुढची मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीचा हा वेग पाहता, अंतिम निकाल यायला उशीर होण्याची शक्यता आहे. अर्ध्या तासापेक्षा अधिकचा वेळ झाला तरी अद्याप एकही निकाल हाती आलेला नाही . निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कामकाज संथ गतीने सुरू आहे.

Published on: Apr 29, 2023 10:24 AM
Ratnagiri Barsu Refinery | 164 महिलांना टेबल जामीन, 37 पुरुषांचं भवितव्यावर आज न्यायलयात फैसला
‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचं वर्चस्व; 12 जागांवर विजय