June 1st Birthday : एकाच वेळेस 51 जणांचा एकत्रित वाढदिवस साजरा, कुठं झालं जंगी सेलिब्रेशन
VIDEO | सर्वाधिक वाढदिवस असणारा दिवस म्हणजे १ जून..., या दिवसानिमित्त एकाच वेळेस 51 जणांचा वाढदिवस झाला साजरा
पुणे : 1 जून रोजी बऱ्याच जणांचे वाढदिवस साजरे करण्यात आल्याचे दिसले. अशातच सोशल मिडीयावर सर्वाधिक वाढदिवस असणारा दिवस म्हणजे १ जून असे मीम्सही व्हायरल होत होते. तर पुण्यातील एका गावात तब्बल ५१ जणांचा एकाच वेळेस जंगी बर्थडे साजरा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. पुण्याच्या भोर तालुक्यातील म्हाळवडी गावात, एकाच वेळेस ५१ जणांचा केक कापून एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला.युवकांच्या कल्पनेतून १ जून वाढदिवस दिन, गावच्या मंदिरात केक कापून वाढदिवस सामुहिक रित्या साजरा करण्यात आला. गावातील दोन वर्षाच्या मुलासह १०४ वर्षाच्या आजीचा यामध्ये सहभाग होता. अशा प्रकारे वाढदिवस साजरा केल्यानं, जेष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.सध्या पंचक्रोशीतं या वाढदिवसाची चांगलीच चर्चा होताना दिसतेय.
Published on: Jun 02, 2023 01:50 PM