रंकाळा तलावातील शेकडो मासे मृत पडल्यानंतर आता इंद्रायणीत मृत माश्यांचा खच, काय आहे कारण?
VIDEO | इंद्रायणी नदीत मृत माश्यांचा खच, पाण्याचा अहवाल आला समोर; डॉक्टर म्हणतात...
पुणे : प्रदूषित पाण्यामुळे कोल्हापुरातील रंकाळा तलावातील शेकडो मासे मृत पडल्याची घटना समोर आल्यानंतर आता इंद्रायणी नदीतील माशांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यानंतर या नदीतील पाण्याचा नमुन्याच्या अहवाल समोर आला. यावरून असे समोर आले की, इंद्रायणी नदीच्या पाण्यातील माशांचा मृत्यू रसायनयुक्त पाण्याने नाही तर पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे. त्यामुळे सूर्य किरण शेवट पर्यंत पोहचत नाहीत. माशांचे मुख्य खाद्य पाण्यातील शेवाळ आहे.जलपर्णीमुळे मासे शेवाळ खाऊ शकत नाहीत. त्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नदीतील पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यावेळी पाणीही गढुळ असल्याचाही अहवाल प्राप्त झाला आहे. दूषित रसायन युक्त पाण्याने हे मासे मृत झालेले नाहीत. असे अहवालात देण्यात आले आहे.
Published on: May 30, 2023 01:40 PM