Women Bus Video : … अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्या दारुड्याला बसमध्ये चांगलंच चोपलं, बघा व्हिडीओ
महिलेने छेड छाड करणा-या व्यक्तिला मारतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या धाडसाच मोठं कौतुक होत आहे.
पुणे येथे सिटी बसमध्ये एका महिलेची छेडछाड करणा-या दारूड्या व्यक्तिला एका महिलेने चांगलाच धडा शिकवल्याचे पाहायला मिळाले. यावेळी छेडछाड करणा-या दारूड्याला महिलेने चांगलाच चोप दिला. महिलेने छेड छाड करणा-या व्यक्तिला मारतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या धाडसाच मोठं कौतुक होत आहे. प्रिया लष्करे असं या महिला रणरागिनीचं नाव असून त्यांचं सासर पुणे येथील तर माहेर नाशिक येथील आहे. सध्या प्रिया लष्करे या कोपरगाव तालुक्यातील खाजगी शाळेत शिक्षेका म्हणून नोकरी करतात. या घटनेची सविस्तर माहिती प्रिया लष्करे आणि त्यांचे पती राहुल लष्करे यांनी टिव्ही 9 शी बोलताना दिली. कोणी वाईट कृत्य करत असेल छेड काढत असेल त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे. समाजाने देखील अशा घटना घडत असताना सोबत उभे राहावे असं आवाहन प्रिया लष्करे यांनी केल आहे. बघा व्हिडीओ