Pune CNG | पुण्यातील ‘या’ भागात सीएनजीचा तुटवडा, काय आहे कारण?

| Updated on: May 14, 2023 | 8:02 AM

VIDEO | सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे : पुणे (Pune) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सीएनजी पंपावर सीएनजीचा (CNG Gas) तुटवडा निर्माण होत आहे. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पेट्रोल, डिझेलप्रमाणे सीएनजीच्या दरानेही ८५ रूपये पार केले असताना दुसरीकडे पंपावर सीएनजीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने इंधन तुटवडा निर्माण होत आहे. हा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाहन चालकांना सीएनजी पंपावर कधी लांबच्या लांब रांगांमुळे वेळेच्या अपव्ययासह तर कधी गॅस नसल्याने पंप बंद असल्याने मानसिक त्रास सोसावा लागत आहे.

 

 

 

Published on: May 14, 2023 08:02 AM
कर्नाटक विजयाने मविआत उत्साह! महाराष्ट्रात कोणत्या समिकरणांची नांदी
कर्नाटक विधानसभा निकालावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘काल भाजप, आज काँग्रेस, तर उद्या…’