मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल हॅक, कनेक्शन थेट कर्नाटकात? काय घडला प्रकार?

| Updated on: Mar 27, 2023 | 9:00 PM

VIDEO | मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली, स्वतः भाजप नेत्यानं सांगितला काय घडला प्रकार?

Follow us on

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धमकीच्या प्रकरणानंतर आता भाजप नेते आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या खंडणीतील प्रकाराबाबत कर्नाटक मधील व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल हॅक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या मित्रांना कॉल करण्यात आले आणि त्यानंतर पैसे मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून त्यामध्ये नुकतीच पुणे पोलिसांनी एक कारवाई केली आहे. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामधील एक संशयित कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा रेषेवरील भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून त्यांच्याकडून अनेक साहित्य जप्त केल्याची माहिती स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती देत असतांना असे सांंगितले की, दोन दिवसांपूर्वी माझा मोबाईल हॅक करून अज्ञात इसमाने माझ्या जवळच्या मित्रांकडे पैसे मागितले होते. वारंवार फोन करून पाहण्यात आले त्यानंतर माझ्याशी मित्राचा संपर्क झाला आणि सगळं समजलं.