पुणे स्थानकातून सुटणाऱ्या १२ लोकल, एक्स्प्रेस गाड्या रविवारी रद्द, काय आहे कारण?
VIDEO | रविवारी पुण्यातून कुठं रेल्वेने प्रवास करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आणि एक्स्प्रेस ट्रेनही रविवारी रद्द, काय आहे कारण?
पुणे, १८ ऑगस्ट २०२३ | रविवारी पुण्यातून कुठं रेल्वेने प्रवास करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. तांत्रिक कामांमुळे पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या एकूण 12 रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. चिंचवड ते खडकी रेल्वे स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांसाठी रविवारी लोकल रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकातून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या 12 गाड्या तर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या 12 गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुणे-लोणावळा, पुणे-तळेगाव, डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस या रेल्वे गाड्यादेखील रविवारी धावणार नाहीत.
पुणे – लोणावळा (वेळ 7.15) पुणे – तळेगांव (वेळ 7.38) शिवाजीनगर – लोणावळा (वेळ 8.50) पुणे – तळेगांव (वेळ 9.43) पुणे – लोणावळा (वेळ 10.42) पुणे – लोणावळा (वेळ 12.02 पुणे – लोणावळा (वेळ 15.45) डेक्कन एक्सप्रेस (वेळ 15.57) पुणे – तळेगांव (वेळ 16.32) कोयना एक्सप्रेस (वेळ 16.42) पुणे – लोणावळा (वेळ 17.10) शिवाजीनगर – लोणावळा (वेळ 17.56)