Pune | ब्रिटिश कालीन भाटघर धरणाने गाठला तळ, ‘या’ तालुक्यांवर पाणीटंचाईचं संकट

| Updated on: May 07, 2023 | 9:28 AM

VIDEO | धरणात फक्त इतके टक्के पाणीसाठा शिल्लक, नागरिकांनो पाणी वापरा जरा जपून

विनय जगताप, पुणे : पुण्याच्या (Pune News) भोर तालुक्यातील ब्रिटिश कालीन भाटघर धरणानं तळ गाठला आहे. धरणात केवळ 20 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून सोडण्यात आलेलं उन्हाळी आवर्तन आणि उन्हामुळं पाण्याचं होणार बाष्पीभवन यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण तालुक्यातील शेतीला आणि गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. 23 टीएमसी इतकी या धरणाची पाणी क्षमता आहे. पाऊस वेळेवर दाखलं न झाल्यास धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यांवर पाणीटंचाईचं संकट ओढवू शकतं. दरम्यान पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसानं तालुक्यातील काही गावांना झोडपून काढलं, तासभर पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झालं होत. तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पहायला मिळतय.

 

 

Published on: May 07, 2023 09:28 AM
कोकणात ठाकरेंच्या दोन तोफ धडाडल्या; उद्धव अन् राज यांचा रिफायनरीला विरोध? राणे-भाजपची कोंडी होणार?
Cyclone Mocha : बंगालच्या उपसागरात मोका चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा