हे काश्मीर नाही तर पुणं आहे, पुण्यातील ‘या’ भागात झाला गारांचा पाऊस, बघा व्हिडीओ
VIDEO | पुण्यातील 'या' भागात 'काश्मीर'चं सौंदर्य, गारांचा पडला खच, बघा व्हिडीओ
पुणे : पुण्याला काल अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं आहे. पुण्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिल्यानंतर पुणेकरांची एकच दाणादाण उडाली. पुण्यात अनेक भागात गारांचा पाऊस पडला. अशातच पुण्यातील कात्रज घाटात पडलेल्या गारांचा पावसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मिनी काश्मीर म्हणून चांगलाच व्हायरल होत आहे. काल दुपारी झालेल्या या गारांच्या पावसामुळे पुण्यात नागरिकांचा गोंधळ उडाला तर पुण्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. तर पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यानंतर पुढीन दोन दिवस पुण्यात अवकाळी पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
Published on: Apr 16, 2023 06:41 AM