Pune PMPL | पीएमपीएलचा पुणेकरांना दिलासा, प्रशासनाकडून नवे दर जाहीर

| Updated on: Sep 03, 2021 | 11:50 AM

पुण्यातील पीएमसी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या संचालक मंडळाच्या बैठकीत दैनंदिन आणि मासिक पासेसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune PMPL | पुण्यातील पीएमसी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या संचालक मंडळाच्या बैठकीत दैनंदिन आणि मासिक पासेसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी 7 सप्टेंबरपासून केली जाणार आहे. दुसरीकडे तिकीट दरवाढ करण्याचा पीएमपीएमएल प्रशासनाचा निर्णयही रद्द करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पासेसचे दर कमी करण्यासंदर्भात आणि दरवाढ टाळण्यासाठी महापौर मोहोळ यांनी आग्रही सूचना केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. | Pune PMPL bus ticket rate reduces Mayor Murlidhar Mohol declared

Ambarnath | अंबरनाथमध्ये मंद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा
Sanjay Raut | कर्नाटक सरकारने द्वेषबुद्धीने बेळगाव पालिका बरखास्त केली : संजय राऊत