Pune | आरोग्य विभागाचा गट ड प्रमाणे क गटाचाही पेपर फुटला, अमिताभ गुप्ता यांची माहिती
आरोग्य भरती प्रक्रिया पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाचा गट ड प्रमाणे क गटाचाही पेपर फुटला असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. आम्ही दोन एजंटांना काल अटक केल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.
आरोग्य भरती प्रक्रिया पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाचा गट ड प्रमाणे क गटाचाही पेपर फुटला असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. आम्ही दोन एजंटांना काल अटक केल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. गट क च्या पेपरफुटीमध्ये न्यासा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत लिंक पोहोचत असून त्यांना देखील ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
गट क प्रकरणी पुणे पोलिसांनी काल दोघांना अटक केली आहे. गट ड पेपरफुटीचं कट क मध्येही कनेक्शन असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गट ड परीक्षेसंदर्भात आम्ही 15 पेक्षा अधिक जणांना अटक केलीय तेच लोक गट कमध्ये सहभागी असल्याचं म्हणता येतं, असं अमिताभ गुप्ता म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार अधिकारी वर्गातून 400 ते 500 तर सॉफ्टवेअर कंपनीकडून 400 ते 500 लोकांपर्यंत पेपर पोहोचले असल्याची शक्यता आहे. तर, गट क साठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले असल्याचं अमिताभ गुप्ता म्हणाले.