Pune Porsche Accident Case : पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

| Updated on: May 21, 2024 | 5:02 PM

शनिवारी रात्री पुण्यात कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कार चालवणाऱ्या आरोपीने एका दुचाकीला उडवलं. यात दुचाकीवरील अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. तर आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप होतोय. यावर पुणे आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलंय

पुणे अपघात प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव नाही, असे स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पोलिसांनी कोणाला धमकी दिली असेल तर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. नातेवाईकांना धमकी दिल्याच्या आरोपांवर पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फोन करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांवर कोणाताही दबाव नाही, कडक कारवाई व्हावी हीच पोलिसांची भूमिका आहे. आरोपींनं मद्यप्राशन करून भरधाव वेगात कार चालवली असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतंय. आरोपीचा ब्लड रिपोर्ट अद्याप आला नाही, अशीही माहिती त्यांनी दिली. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातप्रकरणी आज खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली.

Published on: May 21, 2024 05:02 PM
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याच्या वक्तव्यानं चर्चा
Bhiwandi Lok Sabha Constituency : कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडलं?