खरंच सॅल्यूट… भर पावसात ‘कर्तव्यदक्ष’ महिला पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
पुण्यातील कात्रज चौकात महिला वाहतूक पोलीस भर पावसात वाहतूक नियमन करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लांबे यांचा हा व्हिडीओ आहे. वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लांबे यांनी पावसामध्ये उभं राहून वाहतूक नियमन केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर होणाऱ्या व्हायरल व्हिडीओनंतर शिल्पा लांबे यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक होताना दिसत आहे. पुण्यात काल बालेवाडी येथे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला. बालेवाडी येथे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. दरम्यान, पुण्यात काल लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ असताना नेमकं त्याचवेळी जोरदार पाऊस बरसला. जोरदार पाऊस कोसळल्याने पुणेकरांची चांगलीच गोची झाली. लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसातही ट्राफिक जामची समस्या निर्माण होऊ नये म्हणून भरपावसात वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लांबे यांनी आपले कर्तव्य बजावले. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.