माझी आवडती कार? माझा बाप बिल्डर… पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला मिळणार ‘हे’ बक्षीस
पुणे कार अपघात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या अपघातानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून सरकार आणि गृहमंत्र्यांवर हल्लाबोल विरोधकांकडून केला जात आहे. पुणे अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला सुरूवातीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती.
पुण्यात कार अपघात प्रकरणानंतर युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर निबंध स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. पुणे कार अपघात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या अपघातानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून सरकार आणि गृहमंत्र्यांवर हल्लाबोल विरोधकांकडून केला जात आहे. पुणे अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला सुरूवातीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती. आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा पोलिसांनी सुनावल्यानंतर या शिक्षेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. माझी आवडती कार? माझा बाप बिल्डर असता तर? असे निबंध स्पर्धेचे विषय ठेवण्यात आले आहे. तर या निबंध स्पर्धेत प्रथम येणाऱ्याला ११ हजार १११ रूपयांचं रोख पारितोषिक असणार आहे.
Published on: May 26, 2024 01:02 PM