हवे तेवढे पैसे घ्या, पण… ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं? अपघातात वाचलेल्या प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनं खळबळ
हा अपघात झाला, त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी अमिन शेख यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. जेव्हा अपघात झाला तेव्हा लोक त्या कारमधल्या मुलांना मारू लागले. तेव्हा त्या मुलांनी मारणाऱ्या लोकांना पैशांची ऑफर दिली. तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे देतो, पण....
पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन केसमुळे राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत असून हे पुणे कार अपघात प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलं आहे. पुणे कार अपघातात वाचलेल्या प्रत्यक्षदर्शीने टीव्ही ९ मराठीला महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. पोर्शे कारने जेव्हा बाईकला धडक दिली तेव्हा बाईकवर असलेली तरूणी हवेत उडाली आणि खाली पडताच जागेवर दगावली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अमिन शेख याने म्हटलं आहे. तर या अपघातानंतर अल्पवयीन आरोपीने उपस्थितांना पैसे ऑफर केल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात झाला, त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी अमिन शेख यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. जेव्हा अपघात झाला तेव्हा लोक त्या कारमधल्या मुलांना मारू लागले. तेव्हा त्या मुलांनी मारणाऱ्या लोकांना पैशांची ऑफर दिली. तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे देतो, पण आम्हाला मारू नका, असं त्या मुलांनी सांगितल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.