बिल्डरच्या पोरासाठी कोण-कोण विकलं गेलं? 3 लाखात आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले
ज्या अप्लवयीन आरोपीनं दारू पिऊन दोन निष्पाप जीव घेतले. त्याच आरोपीचं ब्लड सॅम्पल ससून रूग्णालयात बदलण्यात आलं. आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकून दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल चाचणीसाठी पाठवण्यात आलं. नेमकं काय घडलं? कुणी केली मोठी हेरगिरी?
एका बिल्डरच्या पोराला वाचवण्यासाठी पोलिसांपासून प्रशासनातील अधिकारी ते डॉक्टरसुद्धा पैशांसाठी कसे नतमस्तक झाले ते आता समोर येत आहे. दारू पिऊन असतानाही ससूनच्या डॉक्टरांनी आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये तीन लाखात फेरफार केलेत. पुण्यातील अपघात प्रकरणात डोकं चक्रावून टाकेल असे कट रचण्यात आले. ज्या अप्लवयीन आरोपीनं दारू पिऊन दोन निष्पाप जीव घेतले. त्याच आरोपीचं ब्लड सॅम्पल ससून रूग्णालयात बदलण्यात आलं. आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकून दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल चाचणीसाठी पाठवण्यात आलं आणि ही हेरगिरी करणारे ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ. या दोघांनीही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे अपघात प्रकणाला आता वेगळं वळण आलंय. नेमकं काय घडलं? बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: May 28, 2024 10:12 AM