पुणेकरांनो गावाला जायचंय…नो टेन्शन, पुणे रेल्वे स्थानकातून दिवाळीसाठी 391 जादा रेल्वे धावणार

| Updated on: Nov 08, 2023 | 5:42 PM

पुणे रेल्वे स्थानकातून दिवाळीसाठी 391 जादा रेल्वे गाड्या सुटणार. दररोज दीड लाख प्रवासी रेल्वेतून प्रवास करणार असल्याचा अधिकाऱ्यांनी अंदाज. राज्यासह देशभरात पुणे रेल्वे स्थानकातून जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याने पुण्यातील रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण

पुणे, ८ नोव्हेंबर २०२३ | पुण्यातील नागरिकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. पुणे रेल्वे स्थानकातून दिवाळीसाठी 391 जादा रेल्वे गाड्या सुटणार आहेत. दररोज दीड लाख प्रवासी रेल्वेतून प्रवास करणार असल्याचा अधिकाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. राज्यासह देशभरात पुणे रेल्वे स्थानकातून जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याने पुण्यातील रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दिवाळीनिमित्त पुणे रेल्वे स्थानकावर सुरक्षेसाठी चोख बंदोबस्तदेखील करण्यात आला आहे. पुण्यावरून उत्तर प्रदेश, झारखंड रांची, यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुणे रेल्वे स्थानकातून दिवाळीनिमित्त या जादा रेल्वे गाड्या सुटणार आहेत. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर, नागपूरसाठीही जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. तर रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे स्थानकावर अतिरिक्त तिकीट काउंटर उभारण्यात आले आहे.

Published on: Nov 08, 2023 05:42 PM
आम्ही शिवसेना भवन ताब्यात घेतलं असतं पण…, राऊतांच्या ‘त्या’ टीकेवरून संजय शिरसाट याचं प्रत्युत्तर
नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार, कुणी केली सडकून टीका