पुणेकरांची चिंता वाढली, खडकवासलातून पाण्याचा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली अन्…
पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून 27 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीपत्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात येणार आहे. पुणे शहरासह जिल्हाला आज पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
पुण्यात पावसाचे थैमान अजूनही सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात पाणी पातळी वाढत आहे. यामुळे खडकवासला, पवना, चासकमान आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पुणे पुन्हा पाण्याखाली जाण्याची चिन्हे आहेत. पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून 27 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीपत्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात येणार आहे. पुणे शहरासह जिल्हाला आज पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून आज सकाळपासून पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे. पुण्यातील अनेक भागात महापालिका कर्मचाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.