Pune | श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात आकर्षक सजावट

| Updated on: Aug 18, 2021 | 11:07 AM

आज पुत्रदा एकादशी. त्याचेच औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय. माऊलींच्या समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात रंगबिरंगी फुले वापरात ही सजावट करण्यात आली.

आज पुत्रदा एकादशी आहे. त्याचेच औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय. माऊलींच्या समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात रंगबिरंगी फुले वापरात ही सजावट करण्यात आली. विविध धार्मिक दिवसांचे महत्व लक्षात घेऊन मंदिर प्रशासन मंदिरात आकर्षक सजावट करत आहे. आज ही पुत्रदा एकादशी निमित्त ही आकर्षक सजावट करण्यात आलीय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्ट पासून पंढरपूर सह सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान आज पंढरपुरात संचार बंदी असतानाही भाविकांची श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे.आज जवळपास पन्नास हजार भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत.  एकादशीच्या निमित्ताने अनेक भाविक आज पंढरपुरात आले आहेत. सकाळपासूनच चंद्रभागा स्नान आणि संत नामदेव पायरी पासून विठ्ठल दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडालि आहे त्यामुळे एका बाजुला पंढरपूर मध्ये कडकडीत बंद तर मंदिर परिसरामध्ये भाविकांची मांदियाळी असल्याचे चित्र पहायला मिळाले .

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 August 2021
पाचव्या समन्सनंतरही अनिल देशमुख ईडी कार्यालयात जाणार नाही, कारण काय?