विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सरकारी वकिलांची मागणी कोर्टानं फेटाळली अन् नोंदवला ‘हा’ गुन्हा
विशाल अग्रवालला याआधी पुणे सत्र न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती कोठडी आज संपल्यानंतर आज पुन्हा विशाल अग्रवालला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने नाकारत विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा वडील विशाल अग्रवाल याची आज कोठडी संपणार होती त्यामुळे त्याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी विशाल अग्रवालची पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण कोर्टाने नाकारत विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, विशाल अग्रवालच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं तर विशाल अग्रवालवर पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. विशाल अग्रवालला याआधी पुणे सत्र न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती कोठडी आज संपल्यानंतर पुन्हा कोर्टाने हा निर्णय दिला आहे. तर दुसरीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली या प्रकरणी महत्वाचा खुलासा केला आहे.
Published on: May 24, 2024 05:59 PM