संजय राऊत पुण्यात येणारचं, अडवून दाखवा, शिवसेनेचं भाजप नेत्यांना आव्हान
जोपर्यंत राऊतांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पुण्यात फिरकू देणार नाही, असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता. त्यांनी राऊतांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवत राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती.
वादग्रस्त विधानाबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होते तर मग कोथळा बाहेर काढण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांना वेगळा न्याय का? असा सवाल भाजपने विचारलाय. जोपर्यंत राऊतांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पुण्यात फिरकू देणार नाही, असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता. त्यांनी राऊतांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवत राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती. आता शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी जगदीश मुळीक यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. संजय राऊत पुण्यात येणार, अडवूनच दाखवा असं आव्हान शिवसेनेनं भाजप नेत्यांना दिलं आहे. गणेशोत्सवासाठी संजय राऊत पुढील आठवडयात पुण्यात येणार असल्याची माहिती संजय मोरे यांनी दिली. संजय राऊतांना अडविण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने भाजपला उत्तर देण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीनं देण्यात आला आहे.