किशोर आवारे हत्या प्रकरणाला नवं वळण, माजी नगरसेवकाच्या मुलाकडून हत्येची सुपारी अन्…

| Updated on: May 14, 2023 | 12:35 PM

VIDEO | सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्याप्रकरणात नवा मोठा ट्विस्ट, पोलीस तपासातून मोठी माहिती झाली उघड

पुणे : पिंपरी चिंचवड येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. तळेगावात अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला होता. या पोलीस तपासादरम्यान किशोर आवारे हत्याप्रकरणात नवं वळण समोर आले आहे. किशोर आवारे यांची हत्या माजी नगरसेवकाच्या मुलानेच केल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक केली आहे. नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेलं आहे. अटकेतील आरोपींनीच हत्येमागचं कारण सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. म्हणून गौरव खळदेला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. आवारे हत्याप्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचंही उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

Published on: May 14, 2023 12:35 PM
ऊन वाढलं असताना एनर्जी ड्रिंक खरेदी विक्रीवर बंदी; कुठल्या जिल्ह्यात बंदी?
मुंबईकरांचा प्रामाणिकपणात पाहा कितवा नंबर, पुणेकर ऐकून हसतील की मनात जळतील?