दगडूशेठ गणपती जन्मोत्सव सुवर्ण पाळण्यात होणार
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा करण्यात येणार आहे. भाविकांनी दिलेल्या सोने त्यासाठी वापरण्यात येणार आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा करण्यात येणार आहे. भाविकांनी दिलेल्या सोने त्यासाठी वापरण्यात येणार आहे. २ किलो ८०० ग्रॅम सोने त्यासाठी वापरण्यात येणार आहे. २५ जानेवारी रोजी मंदिरात गणेश जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेने रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरु केली.
Published on: Jan 24, 2023 11:36 AM