पुणे न्यूज, खेड-शिवापूर टोलचा प्रश्न पेटला
खेड शिवापूर टोल नाक्यावर स्थानिकांकडून करण्यात येणाऱ्या टोलचा प्रश्न पेटलाय. नागरिकांनी टोल वसुली थांबवण्याची मागणी केलीय.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी आहे. किल्ल्यावर रात्रीचा मुक्काम बंद केला आहे. किल्ल्यावर करण्यात येणाऱ्या घाणीमुळे पुरातत्व विभागाला हा निर्णय घ्यावा लागलाय. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर तीन महिने मुदतीच्या कैदेची शिक्षा किंवा पाच हजार रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. पुरातत्व विभागाकडून हे आदेश जारी करण्यात आलेत. शिवाजी महाराजांचे सर्वाधिक वास्तव या किल्ल्यावर होते. पुणे महानगर पालिकेची पाण्याची थकबाकी ७० कोटींवर गेली आहे. दरम्यान खेड शिवापूर टोल नाक्यावर स्थानिकांकडून करण्यात येणाऱ्या टोलचा प्रश्न पेटलाय. नागरिकांनी टोल वसुली थांबवण्याची मागणी केलीय.
Published on: Feb 16, 2023 10:36 AM