पुणे टॉप न्यूज : पुणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालय होणार पेपरलेस
पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दोन महिने बंद राहणार आहे. कर्जत स्थानकावर काम सुरु असल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय पेपरलेस होणार आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. पुणे महानगरपालिकेतून दोन गावे वगळण्याची सूचना राज्य शासनाने केली आहे. यामुळे पुणे मनपातील दोन गावे कमी होणार आहे. इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या नाल्यांमधून रंगीत पाणी येत होते. त्यासंदर्भातील तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर मनपाच्या पथकाने पाहणी केली. त्यात सहा उद्योजकांनी त्यांच्या कंपन्यांतील सांडपाणी नदीत सोडल्याचे आढळून आहे. त्या सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दोन महिने बंद राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय पेपरलेस होणार आहे.
Published on: Jan 30, 2023 10:49 AM