वाहतूक पोलिसाला 800 मीटर फरफटत नेलं, पुण्यातील कार चालकाचा धक्कादायक प्रकार उघडकीस
पूर्वीच्या थकित वाहतूक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कार चालकाने वाहतूक पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर त्याला बोनेटवरुन 700 ते 800 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक पुण्यात घडला आहे.
पूर्वीच्या थकित वाहतूक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कार चालकाने वाहतूक पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर त्याला बोनेटवरुन 700 ते 800 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक पुण्यात घडला आहे. या प्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी कार चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
प्रशांत श्रीधर कांतावर (वय 43 वर्ष, रा. कन्हैया कॉम्प्लेक्स, महंमदवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (वय 43 वर्ष) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड आणि साईनाथ नगर आणि झेन्सॉर कंपनी फाटा खराडी बायपास रोड दरम्यान शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचार वाजताच्या सुमारास घडली.