Video: साचलेल्या पाण्यात उतरुन पाण्याचा निचरा, पुण्यातील वाहतूक पोलिसाच्या कार्याला सलाम
कोंढवा लुल्लानगर चौकात साचलेल्या पावसाच्या पाण्यामूळे चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालं होतं. कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस निखिल नागवडे यांनी रस्त्यावर जमा झालेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली.
पुणे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरात व चौकात ड्रेनेजचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावर पाणी जमा होत आहे. कोंढवा लुल्लानगर चौकात साचलेल्या पावसाच्या पाण्यामूळे चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालं होतं. कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस निखिल नागवडे यांनी रस्त्यावर जमा झालेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली. वाहतूक कोंडी सोडवली आणि कर्तव्यावर असतानाही आपलं कर्तव्य चोखपणे नागवडे यांनी पार पाडलं. हे जर पाणी तसंच राहिलं असतं तर छोटे-मोठे अपघात या चौकात झाले असते. नागवडे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाऊस सुरू असतानाही ते ड्रेनेज लाईन मधून पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करत होते रस्त्याने येणारे जाणारे फक्त त्यांच्याकडे पाहत होते.